आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंनी तो चेंडू महायुतीकडे टोलवला.
काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थावर उबाठा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या गर्जना केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी मागच्या भव्य पडद्यावर 2019 चे मुख्यमंत्री पदाची शपथ दाखवली, पण आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मात्र शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासमोर वेगळी भूमिका घेतलीमहाविकास आघाडीने आज ताज हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे जोरदार वाभाडे काढले. शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा राजीनामा मागितला. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आदित्य ठाकरे वर्षा गायकवाड हे नेते हजर होते. सगळ्यांनी एकमुखाने शिंदे – फडणवीस सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.मात्र, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच तो चेंडू महायुतीकडे टोलवला. महायुती गद्दार आणि चोरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का??, त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार का??, हे पहिले त्यांना विचारा. मग आम्ही आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला शरद पवार आणि नाना पटोले यांनी आमचेही तेच मत आहे, असे सांगून दुजोरा दिला.