शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होऊ घातलेल्या भूमिपूजन कामाला स्थानिकांकडून विरोध , मंडप काढून टाकला
. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होऊ घातलेल्या भूमिपूजन कामाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यक्रमाचे भूमिपूजन होऊ देणार नाही, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रातोरात ग्रामस्थांकडून बैठक घेऊन त्या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप काढून टाकण्यात आलाकोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सावंतवाडी शहराला पर्यायी रस्ता ठरणाऱ्या बांदा-दाणोली या रस्त्याला 128 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला