गॅसची कनेक्शन पुरूषांच्या नावाने असल्याने तीन सिलेंडर योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित, शौकतभाई मुकादम.
महाराष्ट्र शासनाने लाखापेक्षा उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबाच्या महिलांसाठी वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अनेक कुटुंबांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण जेव्हापासून गॅस सिलेंडर ही योजना सुरू झाली तेव्हापासून पंच्याहत्तर टक्के गॅस कनेक्शन हे कुटुंबप्रमुख म्हणून पुरूषांच्या नावावर घेण्यात आले आहेत. सदरची योजना ही महिला भगिनींच्या नावावर सुरू करण्यात आली असून पुरूषांच्या नावावर गॅस कनेर्कंशन असल्यामुळे बर्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी या योजनेत सुधारणा करावी अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरूषाच्या नावाने असेल तर ते त्यांच्या पत्नीच्या अथवा कुटुंबातील प्रमुख महिलेच्या नावाने करण्याचे आदेश संबंधित पुरवठा विभागाला व गॅस एजन्सीला देण्यात यावेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या शासनाच्या योजनेचा लाभ होवू शकतो. शासनाची योजना चांगली असली तरी ती सध्या अंमलात येणार नाही. यामुळे तिचा फारसा प्रभावही समाजावर पडणार नाही. मुळात महिलांच्या नावे नोंदणीच नसते याचा प्राधान्याने शासनाने विचार करावा व सामान्यांना त्याचा लाभ द्यावा अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com