संजय राऊतांच्या विरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल.
लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलचं भोवलं आहे. राऊतांच्या विरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडल्याचा खोटा दावा संजय राऊत यांनी केला होता.त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडकी बहिण’ योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.