बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण! एकाला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून उचललं!!
पुणे : शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्य आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून मुसक्या आवळ्यात यश आले आहे.*पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असून, येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तर, दोघा संशयितांना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याचे सागितले जात आहे.*बोपदेव घाटात नेमकं काय घडलं होतं?*गेल्या आठवड्यात बोपदेव घाटामध्ये 21 वर्षे तरुणी मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. त्यानंतर या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवत तिला येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तिघांनी तरूणीवर अत्याचार केले आणि नंतर तिला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले होते.बोपदेव घाटात रात्रीच्यावेळी कोणीच नसते, यामुळे मदतीला कुणीच आले नाही. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. घडलेल्या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केचदेखील प्रसिध्द करण्यात आले आहे.Pune Police arrested one of the three accused in the gangrape case of a 21-year-old woman in Pune: CP Amitesh KumarOn October 4, a gangrape incident was reported under the Kondhwa police station in which a 21-year-old woman was raped by three accused.— ANI (@ANI) October 11, 2024