
खेड तालुक्यातील बहिरवली खाडीत वाळूची बोट उलटली.
खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील बहिरवली खाडीत बुधवारी रात्री वाळू उपसा करणारी बोट उलटल्याची घटना उघडकीस आली. यावेळी एकजण खाडीत बुडत असताना स्थानिकांच्या मदतीने त्यास वाचवण्यात यश आले. बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असताना घटना घडल्याचे समजते.राजाराम भिकू जाधव (रा. तुंबाड-भोईवाडी) असे बालंबाल वाचलेल्या कामगाराचे नाव आहे. बहिरवली खाडीत सक्शन पंपाच्या सहाय्याने अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. बुधवारी रात्रीचा वाळू उपसा सुरू असतानाच बोट उलटली. या बोटीत असलेला कामगार खाडीत पडला. ही बाब अन्य कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. www.konkantoday.com