
काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान मंजूर.
काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. २७९ कोटी रुपयांचे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा. जीएसटी अट शिथिल करून गुमास्ता परवाना असलेल्या काजू व्यापाऱ्याच्या खरेदी पावतीवर अनुदान देण्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याची चर्चा केली आहेत्यामुळे अर्ज दाखल करावे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काजू बागायतदारांशी चर्चा करताना सांगितले.प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठिय्या आंदोलनाला बसले होते. त्यांची भेट मंत्री दीपक केसरकर यांनी घेत चर्चा केली.