
मिर्या एमआयडीसीची चर्चा गावात येवून करा, मिर्या ग्रामस्थांचे मत.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या परिसरातील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राचा विषय हा सडामिर्या व जाकिमिर्या येथील ग्रामपंचायत सदस्य किंवा कोणी पुढारी एवढ्यापुरताच मर्यादितनसून संपूर्ण गावाचा प्रश्न आहे. तरी शासनाला या विषयांमध्ये खरोखरच काही सकारात्मक चर्चा करायची असेल तर गावाची वेळ घेवून बैठक घ्यावी. तसेच एवढ्या मोठ्या संख्येने असलेले गाव आपल्या ठिकाणी बैठकीसाठी येवू शकणार नाही. गावाच्या विषयाची बैठक ही मिर्या गावातच घेतली पाहिजे, अशा आशयाचे पत्र जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांनी दिले.प्रस्तावित मिर्या औद्योगिक क्षेत्रासाठी सडामिर्या व जाकिमिर्या येथील भूसंपादनाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ६ ऑक्टोबर रोजीच्या रत्नागिरी जिल्यातील दौर्यामध्ये तोंडी निर्देश दिले होते. दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना या विषयावर बैठकीला सर्व ग्रामस्थांसह रविवारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी विश्रामगृह रत्नागिरी येथे उपस्थित राहण्याची विनंती केली होती. पण त्या अनुषंगाने अशा गंभीर स्वरूपाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एवढ्या कमी कालावधीमध्ये ग्रामस्थ एकत्रित होवून बैठकीसाठी येणे अवघड असल्याचे जिल्हा प्रशासनाला पत्र देत मंत्री सामंत यांना सुनावले आहे.ही बैठक ग्रामस्थांच्या वेळेनुसार, उपलब्धतेनुसार, पूर्वनियोजित करीम कमी सात दिवस आधी नोटीस देवून घेणे अपेक्षित होते. तसेच ज्या कारणासाठी सडामिर्या ग्रामपंचायत व ग्रुप ग्रामपंचायत मिर्या येथील ग्रामस्थांना बैठकीसाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.www.konkantoday.com