भारतात डिझेल वाहने होणार बंद; डेडलाईन जाहिर!
जर तुम्ही डिझेल वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारत सरकारने डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासाठी ब्लूप्रिंट तयार केली आहे. आता २०२७ पासून डिझेल वाहनांची विक्री करता येणार नाही.*पूर्वी डिझेल वाहनांची वयोमर्यादा फक्त १० वर्ष होती, परंतु आता त्यांच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात येणार आहे. ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने सरकारला यासंबधी एक अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामध्ये २०२७ पर्यंत डिझेल वाहनांवर पूर्ण बंदीची शिफारस केली आहे.वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत वाढणाऱ्या प्रदुषणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे २०२७ पासून डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी आणून ईव्ही वाहने वाढविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे डिझेल वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना आतापासूनच प्रॉडक्शन थांबवावे लागले