दापोली येथे वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यशाळा संपन्न

दापोली :- वनविभाग दापोली आणि वाइल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यूअर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ऑक्टोबर रोजी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयावर प्रबोधनपर कार्यशाळा घेतली.या कार्यशाळेसाठी शंभर विद्यार्थी उपस्थित होते.सर्प व इतर वन्यजीव दिसल्यावर नक्की काय करावे व काय करू नये,यासोबत कोणती काळजी घ्यावी याची सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी खेळीमेळीत संवाद साधत विद्यार्थ्यांना माहिती देण्यातआली.कार्यशाळेसाठी वनविभाग दापोली वनरक्षक शुभांगी भिलारे,शुभांगी गुरव,सुरज जगताप,विश्वंभर झाडे तसेच निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे यांनी निसर्ग संवर्धन विषयी माहिती दिली,वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संस्थेचे मार्गदर्शक सुरेश खानविलकरअध्यक्षमिलिंद गोरीवले,उपाध्यक्ष मनीत बाईत सचिव तुषार महाडिक,सदस्य प्रितम साठविलकर,किरण करमरकर,अनिकेत जाधव,शामल साठविलकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता डॉ.शहारे,मरकड सर.डॉ. मोहोड,डॉ.इंगळे डॉ. सावंत सर डॉ.जैन डॉ. पूनम चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button