अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगहाथ पकडले*
अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगहाथ पकडले. त्याच्याकडून ५० हजार ३५० रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला असून अटक करण्यात आली आहे.पोलिस प्रशासनाकडून सातत्याने मद्य, अमली पदार्थ, गुटखा तसेच मटका-जुगार यावर कारवाई केली जाते. कायद्याचा बडगा कडक नसल्यामुळे पुन्हा-पुन्हा त्याला पाने फुटत असल्याचे शहरात चित्र आहे. गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील माळनाका -थिबापॉईटकडून राजेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी एका कॉलेजच्या गेटजवळ पोलिसांनी संशयित तरुणाला रंगहाथ पकडले.मतिन महामुद शेख (वय ३१, रा. ओसवालनगर रोड, उद्यमनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता ५० हजार ३५० रुपयांचा टर्की (ब्राऊनहेराईन सदृश्य) हा अंमली पदार्थ व इतरा साहित्य त्याच्याकडे आढळले. यामध्ये १० हजार ८५० रुपयांची एक पारदर्शक प्लास्टीक पाऊच त्यामध्ये टर्की (ब्राऊन हेरॉईन सदृश्य) हा अमली पदार्थ असून त्याचे प्लास्टीक पिशवीसह वजन २ ग्रॅमचे असून त्यामध्ये ३१ पुडया आढळल्या