पुणे ते अयोध्या असा सायकल प्रवास करून चिपळूणच्या चार दुर्गांनी एक वेगळा उपक्रम केला.
पुणे ते अयोध्या असा सायकल प्रवास करून चिपळूणच्या चार दुर्गांनी एक वेगळा उपक्रम केला आहे. सायकल प्रवासाने रामलल्लाचे दर्शन घेऊन या महिलांनी मातृशक्तीचा संदेश दिला. या चौघांच्या कार्याचे समाजात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.चिपळूण येथील धनश्री गोखले, डॉ. अश्विनी गणपत्ये, रमा करमरकर आणि ज्योती परांजपे यांनी २१ सप्टेंबरला पुण्यातून सायकल चालवायला सुरवात केली. दररोज १२५ ते १४५ किमी अंतर पार करून महाराष्ट्रातील संगमनेर, मालेगाव, शिरपूर या शहरांना भेटी देऊन मध्यप्रदेशातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वर नगरीला भेट दिली. तेथे त्यांनी राजवाडा, महेश्वर मंदिर आणि नर्मदा घाटाला भेट दिली. पुढे जाऊन श्री ओंकारेश्वर व अमलेश्वर यांचे आशीर्वाद घेऊन बाजीराव पेशवे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन इंदूरला पोहोचल्या. इंदूरमध्ये त्यांनी चिपळूणच्या माहेरवाशिण तसेच माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर उज्जैनमध्ये श्री महाकालाचे दर्शन घेऊन उत्तरप्रदेशातील झाशीच्या राणी लक्षीबाईसमोर नतमस्तक होऊन लखनौ शहराला भेट दिली. ४ ऑक्टोबरला सुरक्षितपणे अयोध्येला पोहोचल्या. या संपूर्ण प्रवासात त्यांना जयंत केळकर आणि वसंत जोशी यांची साथ लाभली. त्यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सायकल प्रवासाचा उद्देश रामलल्लाच्या दर्शनाचा आहे; पण स्वत:ला कमी न समजता तंदुरुस्त राहणे, नोकरी-व्यवसाय, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे