वेळंब विहीर कॉंक्रीटीकरण प्रस्ताव ३ वर्षे धूळखात.
गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील धाडेवाडी म्हालकरवाडी नळपाणी योजनेच्या विहिरीचे कॉंक्रीटीकरण व्हावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव शासनदरबारी गेली ३ वर्षे धूळखात पडला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून पुन्हा येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग यांना निवेदन देत आपली वेदना मांडली आहे.सुमारे २३ वर्षापूर्वी ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून वेळंब घाडेवाडी-म्हालकरवाडी विहिरीचे खोदकाम करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने विहिरीचे कॉंक्रीट बांधकाम करता आले नाही. यासाठी ग्रामस्थ सुमारे ३ वर्षापासून निधीसाठी प्रयत्न करत होते. परंतु अजून निधी उपलब्ध झालेला नसल्याची माहिती गावचे अध्यक्ष धोंडू घाडे यांनी दिली.www.konkantoday.com