चिपळूण नगर परिषदेत २२ पदे रिक्त
चिपळूण येथील नगरपरिषदेतील विविध विभागांसाठी मंजूर २९ पदांपैकी तब्बल २२ पदे रिक्त आहेत. त्यात अभियंत्यांचाही समावेश असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व पदे भरण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नगर परिषद संचालनालयाच्या आयुक्तांना पत्र दिले आहे.या पत्रात म्हटले आहे की, चिपळूण नगर परिषद ही ब वर्ग नगरपरिषद आहे. त्यामुळे अभियांत्रिकी सेवा संगणक, विद्युत, नगर परिषद पाणीपुरवठा व जलनिसःरण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखापाल व लेखापरिक्षक सेवा, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, अग्निशमन सेवा, विकास सेवा या विभागांसाठी एकूण २९ पदे मंजूर आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ७ पदे कार्यरत असून २२ पदे रिक्त आहेत.www.konkantoday.com