श्री देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव साजरा होणार.
श्री देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव साजरा होत आहे.गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी आश्विन शु प्रतिपदा दुपारी १२ वाजता घटस्थापना व देवीची आरती होईल. त्यानंतर पुढील ९ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, ढोल वादन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती श्रीदेवी भगवती पब्लिक ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.