कुवारबाव ग्रामपंचायत तर्फे महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियान स्वच्छता अभियाना. स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
. रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज महात्मा गांधी जयंती निमित्ताने ग्रामविकास अधिकारी ग्राम विकास अधिकारी श्री ए जे नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या अभियानात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सफाई कामगार समवेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फिरून रस्त्यावर टाकलेला कचरा जाळून टाकून परिसर स्वच्छ केला तसेच रहिवाशांना स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र पटवून देऊन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा संदेश घरोघरी पोहोचविण्याची मोहीम राबविली या स्वच्छता अभियानात स्थानिक ग्रामस्थांनी ही उत्स्फूर्त सहभाग दिला पत्रकार कॉलनी येथील रहिवासी श्री प्रभाकर कासेकर तसेच श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री प्रकाश राव शिंदे आदींनीही स्वच्छता अभियानात सहभागी होऊन महात्मा गांधी आणि संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचा स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र जपण्याचे रहिवाशांना आवाहन केले कुवारबाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही लावून रहिवाशांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून परावर्तन केल्याबद्दल ग्रामपंचायतीला त्यांनी धन्यवाद दिले कुवारबाव ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम स्वच्छता अभियानात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही ग्रामविकास अधिकारी श्री नागरगोजे यांनी यावेळी दिले