एसटीला बाप्पा पावला, पावणेतीन कोटी रुपयांचे मिळाले उत्पन्न.
प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. उत्सवकाळात एसटीच्या जादा फेर्यांमुळे विभागाला २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.गणपती उत्सवामध्ये रत्नागिरी एसटी विभागाने २ हजार ६११ जादा फेर्या सोडल्या. गणेशभक्तांसाठी नियमित फेर्या सुरू होत्या. त्यात परतीच्या प्रवासाकरिता जादा फेर्यांचे नियोजन केले. ८ लाख २२ हजार ९०३ किंमतीच्या या फेर्या झाल्या. यातून एसटी विभागाला २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. जादा फेर्यांमधून जवळपास ९३ हजार २४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी महामंडळाने मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवात येण्यासाठी अडीच हजारहून अधिक गाड्या सोडल्या होत्या. बोरिवली, ठाणे, दादर, मुंबई, पुणे आदी भागांतून या गाड्या कोकणात आल्या. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटी विभागाने जादा गाड्या सोडल्या. ग्रुप बुकींगसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २६११ गाड्या परतीसाठी आरति झाल्या. या सर्व गाड्यांमधून लाखभर गणेशभक्त मुंबई, ठाणे, बोरिवली, पुण्यात परतले.www.konkantoday.com