अन्न व औषध प्रशासनामार्फत सहा व्यापार्यांचे परवाने निलंबित.
ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ, उत्पादने मिळावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेवर भर देत काही अस्थापनांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. अस्वच्छता ठेवणार्या ५१ परवानाधारकांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्रुटींमध्ये सुचविलेल्या सुधारणा न करणार्या १५ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावून ६ जणांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत.रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये ही कारवाई केली आहे. जिल्ह्याची जबाबदारी असताना या विभागाच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. तरी चांगल्या पद्धतीने या विभागाची कारवाई सुरू आहे. पंधराच्या वर कामगार असलेल्या परवानाधारक आस्थापनेमध्ये संबंधित कामांचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागाकडून तेथील कामगाराला प्रशिक्षित केले जात आहे. त्यामुळे येणार्या ग्राहकांशी कसे वागावे, कसे बोलावे, स्वच्छता कशी ठेवावी आदी धडे यामध्ये दिले जात आहेत. ग्राहकांना दर्जेदार खाद्य पदार्थ, उत्पादने मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे ५६ लाख २३ हजार परवानाधारक आहेत.www.konkantoday.com