स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी ओलांडला ३२५ कोटीचा टप्पा

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवींनी ३२५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ठेवीदारांचा विश्वास हेच या मोठ्या ठेव संकलनामागचे कारण आहे. संस्थेने ठेवलेली आपली उत्तम आर्थिक स्थिती डोळसपणे पाहिले तर गेली २० वर्षे संस्थेने आर्थिक स्थितीत सातत्याने प्रमाणबद्ध वृद्धी नोंदवलेली आहे. अर्थकारणात सातत्याला अनन्य साधारण महत्व असते आणि स्वरूपानंदने हे सातत्य प्रदीर्घ काळ राखले आहे. सन २००० मध्ये संस्थेच्या ठेवी केवळ २ कोटी ६८ लाख होत्या. सन २००५ मध्ये ठेवी रु. ६ कोटी ३४ लाख पर्यंत पोचल्या. तर २०१० मध्ये ठेवी रु. २२ कोटी ७२ लाख झाल्या. सन २०१५ मध्ये ठेवींनी रु. ९५ कोटी ९५ लाखाचा स्तर गाठला. सन २०२० मध्ये ठेवी रु. २०१ कोटी पार झाल्या. तर २०२४ सप्टेंबर मध्ये ठेवींनी ३२५ कोटींची वेस ओलांडली. ठेवीदारांचा सातत्यापूर्ण प्रतिसाद संस्थेला लाभला. सन २०१५ मध्ये २७,६९० असणारी ठेव खाती २०२४ मध्ये ५० हजार ७०० पार झाली. ठेवी बरोबर ठेव खात्यांची ही वाढ महत्वपूर्ण आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार पतसंस्थेमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात हा अनुभव पतसंस्थेची विश्वासार्हता अधोरेखित करतो. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने संय्यत आकर्षक व्याजदर घोषित केले. कधीही मर्यादेबाहेर व्याजदर देऊन ठेवीदारांना चुकीच्या पद्धतीने आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता, त्यासाठी योग्य नियोजन, योग्य गुंतवणूक, वसुलीची सजग यंत्रणा आणि चौकस रहात केलेला कर्ज पुरवठा, उत्तम ग्राहक सेवा आणि योग्य पद्धतीने प्राप्त केलेला सातत्यपूर्ण नफा व त्यातून निर्माण केलेल्या पर्याप्त तरतुदी यामुळे सुरक्षिततेचे कवच गुंतवणूकदारांना अनुभवता येते. स्वामी स्वरूपानंदचा स्वनिधी ४७ कोटी ८७ लाख असून संस्थेच्या योग्य बँकांत केलेल्या गुंतवणूक १४६ कोटी झाल्या असून २२६ कोटीचा कर्ज पुरवठा व सप्टेंबर २०२४ अखेर ९९.३२% असणारी कर्ज वसुली, ६१% सी.डी. रेशो, २८% भांडवल पर्याप्तता प्रमाण ही सर्व आकडेवारी स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम भक्कम आर्थिक स्थिती दर्शवते. पुढच्या दीड वर्षात ठेवी ५०० कोटी पर्यंत पोहोचण्याचा उद्देश नजरेसमोर आहे. ठेवीदारांच्या उत्तम सहयोगामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न स्वरूपानंद पतसंस्था करणार आहे. अशी विस्तृत माहिती ‘दसरा दिवाळी ठेव योजनेच्या’ पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button