मोराची शिकार करणार्या त्या शिकार्याच्या शोधार्थ वनविभागाची फिल्डींग.
खेड तालुक्यातील कशेडी येथे अज्ञात शिकार्याकडून मोराच्या झालेल्या शिकारीनंतर येथील वनविभाग खडबडून जागे झाले आहे. शिकार्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने फिल्डींग लावली आहे. यासाठी गुप्त पथकामार्फतही करडी नजर ठेवण्यात येणार असल्यचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले.तालुक्यात मोराची शिकार करणारी एक टोळीच कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. कर्टेल-सुकिवली मार्गावर मोराची शिकार होत असल्याची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र याची कुणकुण लागताच शिकार्यांनी पोबारा केला होता.www.konkantoday.com