राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विमानाला टेकऑफ घेण्यास वैमानिकाचा नकार, पोलीस स्थानकात तक्रार दाखल


सध्या राज्याचे मंत्री दिवसा विविध भागात अनेक कार्यक्रम करीत असल्यामुळे त्यांना विमान सेवेचा आधार घ्यावा लागतो राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील मुंबईतील एका विमान कंपनीचे विमान प्रवासासाठी घेतले होते उद्योग भरारी कार्यक्रमासाठी संभाजीनगर ला जाण्यासाठी ते अमरावती विमानतळावर आले असता वैमानिकाने नियम सांगून विमान टेक ऑफ करण्यास नकार दिला त्यामुळे खळबळ उडाली आहे
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले, तेव्हा वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला.उद्योगभरारी या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एकाच दिवशी तीन कार्यक्रम असल्याने मुंबईतील एका एअर कंपनीचे एअरक्रॉफ्ट नेमण्यात आले होते. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम असल्याने ५ वाजता त्यांना टेक ऑफ करायचे होते. मात्र, उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले. आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा, अशी विनंती सामंत यांनी वैमानिकाला केली; परंतु काही नियम सांगत वैमानिकाने नकार दिला. त्यानंतर सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button