खेडमधील सहा हौशी गिर्यारोहकांनी नेपाळमध्ये सर्वोच्च शिखरावर अटकेपार तिरंगा फडकावला.

मनाला  सर्वात जास्त सुख, समाधान व आनंद छंदातून मिळत असतो, याच छंदाची अव्याहतपणे जोपासना करणार्‍या येथील ६ हौशी गिर्यारोहकांनी नेपाळमधील जगातील सर्वोच्च शिखरावर अटकेपार तिरंगा फडकवण्याची साहसी कामगिरी केली. सलग ६ दिवसात समुद्र सपाटीपासून ५,३६४ मीटर उंच व १७,५९८ फूट उंचीवरील नेपाळ व तिबेटच्या सीमेवर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करत पुन्हा एकदा विक्रमाला गवसणी घातली आहे. या धाडसी गिर्यारोहकाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात एखादा छंद जोपासणे ही तशी अवघड बाब म्हणावी लागेल. गिर्यारोहणाच्या छंदात स्वतःच्या सामर्थ्यावर सहनशीलतेवर व निर्णय बुद्धीवर अवलंबून रहावे लागते. निसर्गच गिर्यारोहकाला कार्यक्षेत्र देतो अन विरोधही करतो. मानव विरूद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक गिर्यारोहणाकडे अधिकाधिक प्रवृत्त करत आले आहेत. याचीच प्रचिती येथील ६ गिर्यारोहकांनी घडवून आणली.शहरातील डॉ. उपेंद्र तलाठी, जोगेश साडविलकर, अभय तलाठी, संकेत बुटाला, संदीप नायकवडी व पुणे-दौंडचे डॉ. संदीप कटारीया या ६ गिर्यारोहकांनी साहसी छंद जोपासत नेपाळसारख्या अतिउंच व खराब वातावरणातूनही शिखर सर करताना लौकीकास साजेशी कामगिरी केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button