अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतील राहिल-गृहमंत्री अमित शाह
अजितदादा महायुतीतून बाहेर जाणार की महायुतीतच राहणार? याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतील राहिल, असं गृहमंत्री शाह यांनी म्हटलं आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला ( bjp ) महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशामागे अजितदादांची महायुतीतील ‘एन्ट्री’ कारणीभूत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ( आरएसएस ) भाजपच्या नेत्यांना वारंवार सांगितलं होतं. तसेच, विधानसभेला तरी, अजितदादांनी संगत सोडावी, असा सल्ला ‘आरएसएस’नं दिला होता.महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतच राहणार असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. “अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतच राहील. विधानसभा निवडणुकीत तीनही पक्ष एकत्रित निवडणूक लढतील,” असं अमित शाह यांनी म्हटलं.