नागपूर-मडगाव स्पेशलला मुदतवाढ, प्रवाशांची पसंती

. कोकण मार्गावर आठवड्यातून दोनवेळा चालवण्यात येणार्‍या नागपूर-मडगांव स्पेशलला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. या स्पेशलची सेवा सप्टेंबरअखेरीस संपणार आहे. विदर्भातून धावणार्‍या स्पेशलला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याने २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.०११३९/०११४० क्रमांकाची नागपूर-मडगांव स्पेशल उन्हाळी सुट्टीच्या हंगामापासून कोकण मार्गावर चालवण्यात येत आहे. आतापर्यंत स्पेशलच्या ही स्पेशल कोकणवासियांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानुसार स्पेशलला २८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत स्पेशलच्या ५२ फेर्‍या धावणार आहेत.स्पेशलला वर्धा, कुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी, करमाळी आदी स्थानकात थांबे आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button