मुकेश अंबानी यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बड्डे लोग, बड्डे शौक…ते उगाच म्हणत नाही. त्यात अंबानी यांच्यासारखे श्रींमत असतील तर त्यांच्या चैनीच्या वस्तूही तितक्याच महागड्या असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख अंबानी यांनी त्यांच्या चैनीच्या वस्तूंमध्ये १००० कोटींहून अधिक किंमत असलेल्या Boeing 737 MAX 9 या बिझनेस जेटची खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. अत्याधुनिक बिझनेस जेटची किंमत १००० कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.*भारतातील हे सर्वात महागडे जेट आहे. अल्ट्रा-लाँग-रेंज बिझनेस जेट Boeing 737 MAX 9 ची खरेदी करणारे अंबानी हे पहिलेच भारतीय आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीकडे एकूण ९ खाजगी जेट्स आहेत आणि आता त्यात या विमानाची भर पडली आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक खाजगी जेट्स असलेले अंबानी हे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. Boeing 737 MAX 9 ची नुकतीच चाचणी घेण्यात आले आणि ते काही बदलांसह नवी दिल्लीत दाखल झाले आहे.स्वित्झर्लंडमधील युरोएअरपोर्ट बेसल-मुलहाउस-फ्रीबर्ग (BSL) येथे या जेट्सच्या केबिनमध्ये बदल करण्यात आले होते आणि ते दिल्लीला रवाना झाले होते. १३ एप्रिल २०२३ मध्ये हे विमान स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आणि तेथे सर्व अपग्रेड योग्यरित्या कार्य करत असल्याची खात्री केली गेली. या विमानाची योग्यरितीने चाचणी केली गेली. या खाजगी विमानाची बासेल, जिनिव्हा आणि लंडन ल्युटन विमानतळांवर सहा चाचणी उड्डाणे पार पाडली. २७ ऑगस्ट २०२४ मध्ये या विमानाने बासेल, स्वित्झर्लंड येथून दिल्लीपर्यंतचे शेवटचे उड्डाण घेतले.*मुंबईत लवकरच लँड होणार जेट!** स्वित्झर्लंड ते दिल्ली नऊ तासांची वेळ अन् ६२३४ किलोमीटरहून अधिक प्रवास* अंबानींचे नवीन जेट दिल्ली विमानतळावरील कार्गो टर्मिनल जवळ देखभाल ऍप्रनमध्ये आहे. ते लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.* Boeing737 MAX 9 हे जगातील सर्वात महागड्या विमानांपैकी एक आहे आणि या विमानाला दोन CFMI LEAP-18 इंजिन आहेत.* या विमानाचा MSN क्रमांक ८४०१ आहे आणि एका खेपेत हे विमान ६३५५ नॉटिकल मैल किंवा ११७७० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.* मीडियांनी दिलेल्या वृत्तानुसार अंबानी कुटुंबियांनी या विमानासाठी आतापर्यंत १००० कोटींहून अधिक खर्च केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button