
संगमेश्वर-फुणगूस मार्गावर सीएनजीच्या अवजड गाड्या येथील पंपावर बाहेर उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडी.
संगमेश्वर-फुणगूस मार्गावर सीएनजीच्या अवजड गाड्या येथील पंपावर बाहेर उभ्या केल्या जात असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.हा रस्ता अरूंद असल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे.डिंगणी येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी अवजड वाहने येत असतात. गॅस भरलेल्या गाड्या रस्त्याशेजारी उभ्या करून ठेवण्यात येतात. सीएनजी पंपातून संदेश मिळाल्यानंतर गॅस भरण्यासाठी गाड्या पुढे नेण्यात येतात. याबाबत संगमेश्वर पोलिसांनी मार्गदर्शन करूनही गाड्या पुढे नेऊन पंपाच्या बाहेर लावल्या जात असल्याने या मार्गावरून गणपतीपुळे, करजुवे डिंगणी गावाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे गणपतीपुळेकडे जाणाऱ्या गाड्या निवळीमार्गे संगमेश्वरला न जाता डिंगणी रस्त्याचा वापर करतात.