रत्नागिरी शहरातील संसारे उद्यानामध्ये ध्यानकेंद्र,४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती बसवण्यात येणार
रत्नागिरी शहरातील संसारे उद्यानामध्ये ध्यानकेंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना आहे. हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. यामध्ये प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे. त्यामध्ये १२० नागरिकांना एकाचवेळी ध्यान करता येणार आहे. त्या इमारतीवर ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती बसवण्यात येणार आहे.रत्नागिरी पालिकेने ध्यानकेंद्र उभारण्याचे काम स्वामी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या कामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच कोटी तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये मिळाले आहेत. या ध्यानकेंद्रामुळे रत्नागिरी शहरात आध्यात्मिक केंद्र सुरू होणार आहे.