मुख्यमंत्री होण्याचे तेव्हाही स्वप्न नव्हते. आताही हे स्वप्न नाही-उद्धव ठाकरे.
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी नाही. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला बॅकफूटवर यावं लागलं आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री होण्याचे तेव्हाही स्वप्न नव्हते. आताही हे स्वप्न नाही. माझ्यासाठी माझा महाराष्ट्र महत्वाचा आहे. महाराष्ट्रातली जनता हीच माझी सत्ता, तिच माझी ताकद आहे असे वक्तव्य करत एक प्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे, अशी चर्चा सुरू झाली.