हिंदू धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये, आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये – रामदास कदम यांचा सल्ला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हणत रामगिरी महाराजांचे पाठराखण केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. खेडमध्ये बोलत होते. मधल्या काळात महंमद पैगंबर यांच्याबद्दल करण्यात आलेलं वक्तव्य निषेधार्ह हे असल्याचं सांगत हिंदू धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये, आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये असा सल्ला रामदास कदम यांनी दिला आहे. नाशिकमध्ये मोहम्मद पैगंबर यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराज चांगलेच चर्चेत आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केल्यानंतर त्यांच्याच पक्षातील रामदास कदम यांच्या या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. खेडमधील अलसफा वेल्फेअर फाउंडेशनकडून आयोजित रक्तदान शिबिरात रामदास कदम बोलत होते. मधल्या काळात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल करण्यातआलेला वक्तव्य निषेधार्य आहे. कुणालाही कुणाच्या धर्माविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आपल्या देशात लोकशाही आहे, सर्वधर्मसमभाव आहे. त्यामुळे असे वक्तव्य करून कोणाच्याही भावना दुखावणं चुकीचं आहे.” असं कदम यांनी म्हंटल आहे.