अपमानाला योग्यवेळी उत्तर देईन -योगेश कदम.
दापोली विधानसभा मतदार संघात माझी श्रेया कदम गेल्या अनेक दिवसांपासून बचत गटांसह विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. या समाजकार्याला घाबरून उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी फलकांची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी केला. केवळ पत्नीचाच नव्हे तर तमाम महिलांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. आता गाठ माझ्याशी असून योग्यवेळी उत्तर देईनच, असा गर्भित इशाराही विरोधकांना दिला आहे.दापोली मतदार संघात गणेशोत्सवानिमित्त आमदार योगेश कदम यांचे शुभेच्छा बॅनर्स लावण्यात आले आहेत. दापोली तालुक्यातील टाळसुरे, वाकण येथे लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने फाडल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शिवसैनिक तातडीने घटनास्थळी पोहचून रास्तारोको केला. यावेळी फलकाच्या नासधूसनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. www.konkantoday.com