रत्नागिरी शहरातील सात पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी शहरातील पुतळ्यांबाबत पालिकेने खबरदारी घेतली आहे.त्यासाठी शहरातील सात पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पुतळ्यांचा पाया, चबुतरा, पुतळा किती मजबूत आहे, दुरुस्तीची गरज आहे का याचा अहवाल ही संस्था देणार आहेत.मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सर्वच पुतळ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. पालिका, महापालिकांनी शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार रत्नागिरी पालिकेने शहरातील सात पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.