ज्ञानेश महाराव यांची प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टिका.
ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टिका केली. वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात त्यांनी ही टिका केली आहे.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. यांच्यासमोरच महाराव यांनी ही टिका केल्याने महायुतीने टिकेची झोड उठवली आहे. डोंबिवलीतील रामनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या बाहेर गुरुवारी टाळ मृदुंगाच्या तालावर याचे निषेध आंदोलन केले. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये, परिणाम उग्र होतील असा संतप्त कार्यकर्त्यांनी इशारा दिला.शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनांनी तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध केला. महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती.या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते, मात्र त्यांनी त्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत स्वामी समर्थ मठाबाहेर टाळ मृदुंग आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि शाहू छत्रपती यांच्यावर टीका केली, तसेच या दोघांनी ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याला मूकसंमती दिल्याचा आरोप केला.शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे म्हणाले, आपलीच लोक आपल्याच हिंदू धर्मावर भाष्य करुन समाजात वितुष्ट निर्माण करतात. अशी टिका करणाऱ्यांना, हिंदू धर्मावर बोट दाखवत असेल तर अशांना जोड्याने मारले पाहीजे असे सांगत निषेध व्यक्त केला. तर भाजपचे कल्याण लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, गेले अनेक वर्षे हिंदू धर्मावरती टिका करणारी समाजातील बांडगुळ आम्ही पाहिली आहेत.प्रश्न हा नाही की त्यांनी टिका केली, परंतू हिंदू धर्मातील लोक कधी जागृत होणार याचा विचार पडला आहे. ज्यांना हिंदू देवदेवतांविषयी घेणे देणे त्यांनी त्यावर बोलू देखील नये. सर्व देशवाशीयांना आमची विनंती आहे की, आपली श्रद्धास्थान, आपले देवदेवता यांच्यावर आपण किती दिवस ऐकून घ्यायचे. आज सर्व सामान्य नागरिक, स्वामीभक्त याचा निषेध करण्यासाठी उतरलो आहोत. या कटकारस्थाना विरोधात आपण एकत्र झालो पाहीजे याकरीता आपण आता जागृत झाले पाहीजे असे सांगितले.आंदोलनकर्त्यांनी या प्रकाराला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार म्हणून संबोधले आणि राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये अन्यथा उग्र होतील असा संतप्त इशारा स्वामी भक्तांनी दिला.