उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढण्याची तयारी.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.सगळ्या मागण्या सुरू आहेत, मेरिटवर जागा लढवाव्यात अशी चर्चा सुरू आहे, पण तसं झालं नाही तर शिवसेनेने 288 जागांची तयारी केली आहे, पण आम्ही महाविकासआघाडी म्हणून लढतोय, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.ज्या जागा मागितल्या आहेत त्या वाट्याला येतील, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. अंबादास दानवे धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते.आकड्याचा विषयच निर्माण होत नाही. मेरिट महत्त्वाचं आहे, आकडे जास्त असतील, कमी असतील. महाविकासआघाडीमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा राहणार नाही. ज्यांचं काम ज्या ठिकाणी चांगलं आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, नेतृत्व चांगलं आहे, तो ती जागा लढेल, असं सूत्र राहिल. आम्ही 288 जागांसाठी तयार आहे, पण महाविकासआघाडी होत असताना प्रत्येकाच्या जागेची वाटणी होत असते, त्याप्रमाणे वाटणी होईल,’ असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button