CJI डीवाय चंद्रचूड यांच्या पत्नीविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR ; नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस डी.वाय चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नीविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने गुन्हा दाखल केला आहे. सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने खोटी आणि चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.*दिल्ली पोलिसांनी सांगितेल की सर्वोच्च न्यायालयाच्य अॅडमिन सिक्युरीटी ऑफिसकडून ९ सप्टेंबर २०२४ रोजी यासंबंधी तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीत आक्षेपार्ह ट्वीट आणि फेसबुक पोस्टचा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टमध्ये चुकीची माहिती पसरवण्यात आली होती ज्याचा उद्देश न्यायपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा होता. यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने १० सप्टेंबर २०२४ रोजी एफआयआर दाखल करत चौकशी सुरू केली. एफआयआर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५६, २१७, ३५१, ६१(२)(अ) आणि आयटी ॲक्टच्या कलम ६६(सी) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.या प्रकारचे एक प्रकरण पश्चिम बंगालमध्ये देखील समोर आले आङे, येथे एका व्यक्तीवर चीफ जस्टिस डी वाय चंद्रचूड यांना बदनाम करणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर वार करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी सांगितले की, पुलबारीचे सुजीत हलदार यांच्याविरोधात कृष्णागंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कोठी बातमी लोकांमध्ये अविश्वास आणि सर्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने पसरवण्यात आली होती. तसेच पोलिसांनी खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.