लहान गळती थोपविण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करणार.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे चर्चेत आला होता. बोगद्यातील मोठी गळती ग्राऊटींगच्या सहाय्याने थोपविण्यात आल्याने गणेशभक्तांवरील धोक्याची टांगती तलवार दूर होवून प्रवास सुखकर होत आहे. वाहनांची रहदारी कमी होताच लहान गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.जुलै महिन्यात सतत आठवडाभर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कशेडी बोगद्यात ठिकठिकाणी गळतीचे सत्र सुरू होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याने ग्राऊटींगचा वापर केला होता. मात्र तरीही गळती थोबविण्यात अपयश आल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली होती. वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ व्हावे लागत होते. ऑगस्टअखेरीस राष्ट्रीय महामार्ग खात्याने कामगारांची जादा फौज तैनात करत गळती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. सद्यस्थितीत केवळ लहान गळती सुरू असून वाहनांची रहदारी कमी झाल्यानंतर लहान गळती थोपवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. www.konkantoday.com