महाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट!
* महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा पाऊस आणि या पावसामुळं फोफावणारं आजारपण आता राज्यातील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवताना दिसत आहे. हे संकट सध्या इतक्या गंभीर वळणावर आहे की, सध्या यंत्रणांनी बैठकाही बोलवण्यास सुरुवात केली आहे.*उपलब्ध माहितीनुसार राज्यात कीटकजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध- नियंत्रण समितीची आढावा बैठक बुधवारी पार पडली. यावेळी राज्यात फोफावणारे साथीचे आजारा आणि तत्सम परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. *नागरीकांमध्ये भीती निर्माण होऊ देऊ नका…*आजारपणाबाबत नागरिकांमध्ये दक्षता निर्माण करत त्यांच्यात भीतीचं वातावरण तयार होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करत जनजागृतीची जबबादारी आरोग्य विभागावर सोपवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, सणासुदीचे दिवस आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरही आरोग्याची काळजी घेत दक्ष राहण्याच्या सूचना राज्याचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी या बैठकीमध्ये केल्या. *का फोफावले साथीचे आजार?*राज्यात वाढतं औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि त्यामुळं दिसणारे सातत्यपूर्ण बदल यामुळं साथीच्या आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं मुख्य कारण या उच्चस्तरीय बैठकीत समोर आलं. फक्त कोरोना नव्हे, तर हिवताप, डेंग्सू, कावीळ, कॉलरा, इन्फ्लूएंझा ए, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, स्क्रप टायफस, हिपॅटायटीस “ए”, “ई”, लेप्टोस्पायरोसिस जे ई, चंडिपूरा आणि झिका हे आजार सध्या डोकं वर काढत आहेत. त्याशिवाय गोवर, गालगुंड, घटसर्प, धनुर्वात, पोलिओ, रेबीस, पेर्दुसिस हे जुने साथरोगही सध्या संकटात भर टाकत असून, त्याच धर्तीवर राज्यातील आरोग्य विभागात असणाऱ्या उपविभागांना मार्गदर्शक सूचना देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तत्पर राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.