
चिपळुणात कार-दुचाकीचा अपघात
गुहागर-विजापूर मार्गावरील रामपूर येथे कार व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यात दुचाकीस्वारासह अन्य एकजण जखमी झाला. या प्रकरणी कार चालकावर रविवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल प्रभाकर चिवलेकर (४६, चिवेली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद संतोष नामदेव राठोड यांनी दिली. तर शुभम शंकर घाणेकर (२५, वेळणेश्वर-गुहागर), रोहित रमेश आग्रे (कळझोंडी-रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. www.konkantoday.com