गणेशोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल.
कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणार्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या उत्सवामुळे बाजारपेठेला चांगलीच चालना मिळाली आहे.जिल्ह्यात १ लाख ६७ हजार १०२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूर्वी चाकरमानी मुंबईहून येताना गणेशोत्सवासाठी लागणार्या वस्तूंची खरेदी करत. मात्र आता गाड्यांना असलेली गर्दी आणि तिकिटाची मारामार यामुळे स्थानिक बाजारपेठेतील खरेदीवर अधिक भर दिला जातो. बहुतांश गणेशमूर्ती स्थानिक मूर्तीशाळैतच खरेदी केल्या जातात. त्यासह रेडीमेड मखर, त्यासाठीचे साहित्य, सजावटीच्या विविध वस्तू, प्रसादासाठी लाडू, पेढे, पूजेचे साहित्य या सर्व गोष्टींमधून २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तीकार आहेत. इंधनवाढ, मूर्ती साहित्यातील महागाई यामुळे मूर्तीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. जिल्ह्यात केवळ मूर्ती व्यवसायामुळे आठ ते दहा कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे.www.konkantoday.com