
माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनपासून जवळच रेल्वे रुळावर सिमेंटचा स्लिपर.
माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनपासून जवळच रेल्वे रुळावर सिमेंटचा स्लिपर ठेवण्यात आला होता. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर अज्ञातांनी कपलिंकमध्ये दगडही ठेवले होते असे दिसून आले आहे. लोको पायलट रियाज शेख यांच्या सतर्कतेमुळे घातपाताची घटना टळली आहे. बुधवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे.रेल्वे ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी एक विशेष गाडी असते. या गाडीला टॉवर वॅगन म्हणतात. ही वॅगन मलिकपेठहून कुर्डुवाडीकडे येत होती. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सिग्नल पॉईंटजवळ रेल्वे रुळावर काहीतरी असल्याचे या गाडीचे मोटरमन शेख यांना दिसून आले होते. त्यांनी गाडी थांबवून उतरून पाहिले असता त्यांना दिसले की कोणीतरी रुळावर लोको पायलट व गार्ड यांना सूचना देणारा फॉलोईंग मार्कचा स्लिपर ठेवला आहे. शेख आणि त्यांचे सहकारी जे ई उमेश ब्रदर यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली