जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा विषय रिक्तपदांमुळे ठरला वादग्रस्त
*. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा विषय रिक्तपदांमुळे वादग्रस्त ठरलेला आहे. गेल्या ४ वर्षात दीड हजार पेक्षा जास्त शिक्षक हे आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. आता नव्याने ऐन गणेशोत्सवाच्या प्रारंभालाच २१५ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याने पुन्हा एकदा शिक्षकांची समस्या उभी ठाकली आहे. यामुळे जिल्ह्यात ९०० पदे रिक्त झाली आहेत.जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक कारभार चालवताना जि.प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास २ हजार पदे रिक्त होती. पण शासनाने १ हजार ३४ शिक्षक पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे मे महिन्यात ९९७ शिक्षकांची भरती झाली. त्यामुळे शिक्षण विभागाला मोठा दिलासा लाभला होता.www.konkantoday.com