चिपळूण शहरालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाची गेल्या दोन वर्षापासून प्रवेश प्रक्रिया बंद
चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाची गेल्या दोन वर्षापासून प्रवेश प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे गरजू मागासवर्गीय मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. चिपळूण दौर्यावर आलेल्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेत त्यांनी या वसतिगृहातील समस्या, अडचणी याबाबत व्यथा मांडली.www.konkantoday.com