मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती-रामदास कदम.
माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मोठं विधान केलं आहे. मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ मला दिलं नाही.मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडलं; असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासहीत नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कारवाया केल्याचा धक्कादायक आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांनी आज तोफच डागली.बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री बनवतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. म्हणून उद्धव ठाकरेंनी मला मुद्दाम गुहागरला उभं केलं आणि पाडलं. मी दापोली मतदारसंघ मागितला होता. मात्र काही नेत्यांना सांगून, राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. उद्धव ठाकरे यांच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना फुटली आहे, असा घणाघाती हल्लाच रामदास कदम यांनी चढवला.