इकोफ्रेंडलीचा राजा कल्पवृक्षाचे महत्त्व सांगण्यासाठी कल्पवृक्षातून साकारलेला बाप्पा.
रत्नागिरी: (जमीर खलफे* ) रत्नागिरीतील प्रसिद्ध मेकॅनिक, व रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन चे जेष्ठ पदाधिकारी…. श्री. संजय वर्तक ( कुवारबांव – रत्नागिरी) गेली अनेक वर्षे सातत्याने विविध सामाजिक विषयावर… इकोफ्रेंडली बाप्पा चा देखावा करत आहेत. संपूर्ण वर्तक कुटुबं एक महिना तयारी करत असतात. आपला व्यवसाय साभाळून हौसे ने देखावा नेहमी करत असतात…… यंदा…. कल्पवृक्ष चे महत्व सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न….. बाप्पा च्या देखाव्यातून जनजागृती.नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचे खूप सारे उपयोग आहेत म्हणूनच तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते कल्पवृक्षाचा संदर्भ हा पुराणांमध्ये आढळतो. नारळाचे झाडे किनारपट्टीला लागलेली एक सुंदर देणगी आहे. म्हणूनच नारळाच्या झाडाच्या महत्व बद्दल समाजाला जागरूक करण्यासाठी व नारळाची जास्तीत जास्त लागवड करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी…वर्तक परिवारांने हा देखावा संपूर्ण नारळाच्या झाडापासून साकारलेला आहे. कल्पवृक्ष लावा कल्पवृक्ष वाचवा.असा संदेश देण्यात येत आहे