रीळ, उंडी गावातील जिरायत जमिनीचे अधिमूल्य 6 ते 13 हजार, जमीन मालक मालामाल होणार.
रत्नागिरी तालुक्यातील रीळ गावातील 136 सातबारावरील 153 हेक्टर जमिन उंडी गावामध्ये 49 सातबारा भागांवरील 60 हेक्टर जमीन औद्याेगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी संपादन प्रस्ताव आहे. यासाठी शासकीय जमीन दराच्या चाैपट माेबदला देण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात 6 हजार ते 13 हजार रुपये प्रतिगुंठा एवढा जिरायत क्षेत्राचा भाव शासनाच्या रेडीरेकनरमध्ये नाेंदवला गेला आहे.रत्नागिरी तालुक्यातील रीळ, उंडी गावातील एकूण 213 हेक्टर जमीन संपादित हाेणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या 4 पट एवढ्या प्रमाणात माेबदला मिळणार आहे. प्रस्तावित क्षेत्रातील सर्व जमिनींची माेजणी करण्यासाठी रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकार्यानी प्रस्ताव रत्नागिरी तालुका उपअधिक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे पाठवला आहे. जमीन माेजणी झाल्यानंतर माेबदला परिगणना करण्यात येणार आहे.सध्या रीळ, उंडी परसरातील शासकीय अधिमूल्य तक्त्यामध्ये जिरायत जमिनीसाठी 6 हजार ते 13 हजार रुपये प्रतिगुंठा एवढा दर निश्चित केला आहे. गावठाणातील मिळकतीसाठी 12.00 रू. हेक्टर मीटर एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. नारळ, सुपारी, \ळबागेसाठी सर्वाधिक म्हणजे 26 हजार 600 रू. प्रतिगुंठा दर नमूद केला आहे. आंबा, काजू, केळीसाठी 13 हजार 943 रू. एवढा भाव शासकीय दरात निश्चित करण्यात आला आहे. भूसंपादनाचा माेबदला ठरवत असताना शासकीय दरपत्रकासाेबत प्रचलित बाजारभावाचा विचार करण्यात येताे. महसूल खात्यातील अधिकारी बाजारभावाचा अंदाज घेवून शासकीय अधिमूल्य रकान्यात काही सुधारणा करून प्ररून प्रमाणभूत किंमती निश्चित करू शकतात. यामुळे यापेक्षा अधिक मूल्य भरपाई म्हणून मिळण्याची शक्यता आहे .www.konkantoday.com