पर्यटन अणि शांतता २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून, युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) यांच्याव्दारे सन 2024 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Them) पर्यटन आणि शांतता घोषित करण्यात आले आहे.

जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याव्दारे विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधत जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Them) “TOURISM & PEACE” या घोषवाक्याशी अधीन राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमांव्दारे राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहिती व नियम व अटी शर्तीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,नवीन प्रशासकीय इमारत, A विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी – 415612 (दूरध्वनी-02352-221508/227977) येथे संपर्क साधावा.जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद (MTDC World Tourism Day Seminar) — जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना, टूर्स ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलिअर्स, निवास न्याहरी इ. यांचे परिसंवादाचे आयोजन (सकाळी 10.00 ते दु.1.30 ) करण्यात येणार असून, परिसंवादामध्ये प्रादेशिक स्तरावर मान्यवरांच्या हस्ते मपविमच्या पर्यटक निवासांचे नव्याने छापण्यात आलेल्या माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.निबंध स्पर्धेचे विषय – 1) पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, 2) पर्यटन व जागतिक शांतता, 3) महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, 4) माझ्या स्वप्नातले पर्यटन, 5) भारत व पर्यटन-शांततेचे दूत आणि प्रतिक सदर स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिक स्वरुपामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून मपविमच्या पर्यटक निवासामध्ये 3 दिवस राहण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.चित्रकला स्पर्धेचे विषय – 1) आवडता समुद्र किनारा, 2) कोकणातील ग्रामीण पर्यटन, 3) कोकणातील पारंपरिक मासेमारी, 4) कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ — स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रधान कार्यालयामार्फत प्रमाणपत्र व पारितोषिक स्वरुप प्रादेशिक कार्यालयामार्फत बक्षिस देण्यात येणार आहे. तसेचप्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिक स्वरुपामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून, मपविमच्या पर्यटक निवासामध्ये 3 दिवस राहण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. तसेच मपविम पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास येणा-या पर्यटकांकरिता पारंपारिक खेळांचे आयोजन, निवासा नजीकचं सुरक्षित पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचर वॉक, इ. सह आणखी बरंच काही मनमुराद आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button