टेंभ्ये पुलाजवळ महावितरणच्या ट्रान्स्फार्मरची केबल चोरीला.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये पुलाजवळ महावितरणच्या ट्रान्स्फार्मरची केबल चोरीला गेली. ही घटना १४ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी प्रथमेश दिलीप केळकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांच्या माहितीनुसार, टेंभ्ये पूल येथील ट्रान्स्फार्मर खराब झाल्याने महावितरण कर्मचाऱ्यांकडून तो काढून बाजूला ठेवला होता. १४ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत चोरट्यांनी ट्रान्स्फार्मर खोलून त्यातील तांब्याची ३५ हजार रु. किंमतीची वायर चोरली, अशी तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली