कशेडीचा दुसरा बोगदाही आजपासून वाहतुकीसाठी खुला.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला बहुचर्चित दुसरा बोगदाही ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याने अभियंता पंकज गोसावी यांनी दिली. यामुळे चाकरमान्यांचा प्रवास आणखी वेगवान व आरामदायी होणार आहे. प्रवाशांचीही दुसर्या बोगद्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कशेडी बोगद्याच्या पाहणी दौर्यादरम्यान ३ सप्टेंबरपूर्वी दुसर्या बोगद्याचेही काम पूर्ण होवून चाकरमानी बाप्पाचा जयघोष करत बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कले होते. www.konkantoday.com