उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आले मोठे यश.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली.ही बैठक घडवून आण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना यश आले. या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. तसंच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्यानं गावकरी, विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती. संप मागे घेतल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.