ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा; पगारात मोठी वाढ!
एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे* एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढीची मागणी सरकारने मान्य केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार ५०० रुपये मूळ वेतनात वाढ देण्याचं आश्वासनही बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.