नागरकोईल-गांधीधाम अतिरिक्त डब्यांची धावणार.
कोकण मार्गावर धावणार्या रेल्वेगाड्यांच्या इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर जनरल डब्यात करण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाकडून सुरूच आहे. कोकण मार्गावरून धावणार्या नागरकोईल-गांधीधाम एक्स्प्रेसच्या डब्यांची संरचना बदलण्यात येणार आहे. या एक्सप्रेसला एक अतिरिक्त जनरल डबा वाढवण्यात येणार असून हा बदल ३१ डिसेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. कोकण मार्गावरून धावणार्या एक्सप्रेस गाड्यांचे हाऊसफुल्ल होत असल्याने प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांची कोंडीच होत असते. यातच आरक्षित तिकिटे नसल्यास आरक्षित डब्यातून प्रवास करणार्यांवर दंडात्मक कारवाईसह कोणत्याही स्थानकात उतरवण्याच्या मध्यरेल्वेच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांची कोंडीच झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करून जनरल डबे जोडण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. १६३३६/१६३३५ नागरकोईल-गांधीधाम एक्सप्रेस ३ डब्यांची धावत आहे. या एक्सप्रेसला यापूर्वी केवळ दोनच डबे होते. एक अतिरक्त जनरल डबा वाढवण्यात आल्याने ३ जनरल डब्यांची धावणार आहे. एका थ्री टायर एसीच्या एका डब्यांचे रूपांतर जनरल डब्यात करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे. www.konkantoday.com